लहान मूल म्हणजे एक स्वतंत्र संवेदनशील अस्तित्व- मग ते दत्तक असो वा पोटचं. तरीही ‘दत्तक’ हा विषय आजही थोडा परकाच का वाटतो? माणसाच्या ‘घडण्या’त जन्मदात्यांच्या जनुकांचा प्रभाव किती अन् भोवतीच्या परिस्थितीचा वाटा किती? दिल्या घरी दत्तक जाणाऱ्या बाळाचा अनोळखी भूतकाळ अस्वस्थ का करतो? त्या बाळाचा स्वीकार अनेकांना अवघड का वाटतो? दत्तकप्रक्रियेत अनेकदा शेवटच्या टप्प्यावर चर्चा होते, तो टप्पा कसा आणि का गाठला गेला? त्यात दत्तक व्यक्तींबरोबरच आजूबाजूची माणसं अन् परिस्थिती वेगळी असती, तर परिणाम वेगळा झाला असता का? अशा प्रश्नांची उकल करणारे – ‘दत्तक’ या संकल्पनेकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणारे – टेस्ट-टयूब बेबी अन् सरोगेट मदरच्या जमान्यात दत्तकाविषयीच्या जनमानसाचा कानोसा घेणारे – दत्तक मूल वाढताना, वाढवताना
please login to review product
no review added