उद्योगधंदा म्हटले की गुजराती समाज डोळ्यांसमोर येतो. गुजराती माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो काही ना काही उद्योग सुरू करतो. आज अनेक यशस्वी उद्योजकांमध्ये गुजराती माणसे सर्वाधिक आहे. अशा चार गुजराती उद्योजकांची यशोगाथा शोभा बोंद्रे यांनी ‘नॉट ओन्ली पोटेल्स’मधून कथन केली आहे. महामार्गाच्या कडेला असणार्या हॉटेलना अमेरिकेत मोटेल्स म्हणतात. यातील ५० टक्के मोटेल्सपैकी गुजराती ‘पटेल’ आडनावाच्या व्यक्तींची असल्याने ‘मोटेल्स’चे नामकरण पुढे ‘पोटेल्स’ असे झाले आहे. यात यशस्वी झालेल्या व अन्य गुजराती उद्योजकांची ही गाथा मराठी वाचकांना भावेल व स्फूर्तीही मिळेल.
please login to review product
no review added