स्वरांकित' हा २४ महागायक-गायिकांच्या कार्य-कर्तृत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण ललित भाषा शैलीतील प्रेरणादायी वाङ्मयीन आलेख! माझे मित्र राष्ट्रपती पुरस्कार आणि अनेक इतर पुरस्कारप्राप्त प्राचार्य अशोक चिटणीस यांचे हे मुलाखतींवर आधारीत एकोणिसावे पुस्तक व्यास क्रिएशन्स्, ठाणे द्वारा प्रकाशित !गीतरामायणाची जन्मकथा सांगणाऱ्या सुधीर फडके यांच्या मुलाखतीवर आधारित लेखाने प्रारंभ आणि त्यांचे सुपुत्र संगीत दिग्दर्शक व गायक श्रीधर फडके यांच्यावरील लेखाने 'स्वरांकित'चा समारोप होतो.आशा खाडिलकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, अरुण दाते, डॉ. सलील कुलकर्णी, डॉ. मृदुला दाढे- जोशी, माधव- सुचित्रा भागवत, विभावरी बांधवकर, विनायक जोशी आणि वैशाली सामंत या नामवंत गायक-संगीत दिग्दर्शकांच्या मुलाखती स्फूर्तीदायक आहेत.
please login to review product
no review added