तो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला… मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले… जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना, लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता… अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा.
please login to review product
no review added