• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Te Aani Mi (ते आणि मी)

  Rohan Prakashan

 195

 

 ₹200

 

 

 1

 1


'ते' आणि मी हे शकुंतला पुंडे ह्यांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळंवेगळं ललित पुस्तक. या पुस्तकातल्या 'ते'शी लेखिकेचं एक भावनिक नातं तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे. ते नातं इतकं उत्कट, मधुर अन् जिवाभावाचं झालेलं आहे की, कोकणातला मुक्त, घनदाट, विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच किंवा गॅलरीबाहेरचा 'हिरवा रंगमंच' असो, हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होऊन जातं. 'ते' आणि लेखिका यांचं जगणं एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांशी बांधलेलं, जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होऊन जातं याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र, सतत घडत राहतं. आपल्या बालपणापासून आजपर्यंत 'ते'शी अलगद जुळत गेलेले भावबंध लेखिकेने सरळसाध्या तरीही वेधक अशा शैलीत मांडलेले आहेत. त्यामुळे वाचकही स्वत:च्या नकळत लेखिकेच्या आनंदविश्वाचा वाटेकरी होतो. 'ते' आणि मी हे पुस्तक वाचणं म्हणजे निखळ आनंदाचा अनुभव आहे अन् निखळ अनुभवाचा आनंदही आहे!

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update