"एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग आणि दुस-या बाजूला वेगवेगळी स्वभाववैशिष्टये असलेली अनेक माणसे. मात्र ही सारी माणसे एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. हया कादंबरीत या अशाच माणसांची कथा गुंफली आहे." ’कादंबरी वाचताना एक गोष्ट जाणवते ती ही की, कथानक चित्रपटकथेसारखे आहे. विविध दॄश्ये, एकदम उत्कटं हदयस्पर्शी प्रसंग, खटकेबाज संवाद, माणसांच्या स्वभावाचे विविध नमुने, रुबाब दाखविणारे अधिकारी, कामसू, दारिद्रयात पिडलेले कामगार, भयानक कडे-कोसळणी व या सर्वांच्या तळाशी वाहणारा एक अंत:प्रवाह: "जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? एक यादगारी!"
please login to review product
no review added