जागतिकीकरणामुळे नि तंत्रजगतात अवतरणाऱ्या नित्य नव्या शोधांमुळे जगभरातील माणसं रोज अधिकाधिक जवळ येत आहेत. पण आवाजानंशरीरानं होणा-या जवळिकीला समान भाषेचा दुवा नसेल, तर त्यातून काहीच साधणार नाही, हे लक्षात आल्यामुळे आज जगभरातच विविध भाषा शिकण्याच्या उपक्रमाला प्रचंड गती आली आहे. त्यामुळे भाषांच्या माध्यमातून आपल्याला खराखुरा संवाद साधायचा असेल, जवळीक निर्माण करायची असेल, विश्वास संपादून आपलं कार्य साधायचं असेल, तर काय करायला पाहिजे, नेमकं कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे, यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही सारी शास्त्रीय माहिती साध्या, सोप्या नि रंजक भाषेत सांगणारं हे पुस्तक केवळ भाषा वापरणाऱ्यांनीच नव्हे, तर मूक- बधिरांनीही आपलं संवाद-कौशल्य विस्तारण्यासाठी वाचावं, असं आहे!
please login to review product
no review added