मराठी कथासाहित्यात विजय तेंडुलकरांच्या कथांचे स्थान आगळे ठरावे. एकूणच मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कमालीचा आस्थेवाईक आहे. माणसांची जगण्याची धडपड अतिसूक्ष्मपणे न्याहाळताना त्यांचे शब्द जणू कॅमे-याचा डोळा होतात. आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालीन समाजमानसाचा वेध घेतला आहे. मानवी संबंधांतली गुंतागुंत, स्त्रियांच्या नशिबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट, बदलत्या काळातले व्यावहारिक संबंध, हे सारे त्यांच्या कथांमधे अधोरेखित झालेले असते. सामाजिक विसंगतींवरचे मार्मिक, मर्मभेदी भाष्य खास तेंडुलकरी पध्दतीचे! भाषेची सहजता इतकी अकृत्रिम – इतकी थेट की तेंडुलकर लिहितात आणि अर्थ मनात उमटतो.
please login to review product
no review added