कृतिशील दांपत्यांनी घेतलेल्या भाराऱ्यांचा आस्वादक परिचय असं ' द्विगुणित' ह्या संग्रहाचं एकूण रूप आहे. प्रस्तुत संग्रहात मुलाखतींवर आधारित व्यक्तीशोध आहेत. ह्या केवळ वर्तमानपत्री रुटीन मुलाखती नाहीत. शुभा केवळ माहिती पुरवीत नाहीत. उत्तम आणि उदात्त वाड.मयाच्या परिशीलनाने पक्व झालेल्या ह्या लेखिकेला माणसांची मन जाणून घ्यायची आहेत... माणसं कशी एकमेकात गुंतत जातात, कशी न कुठल्या ताकदीन एकमेकांना सांभाळतात, सांभाळून घेतात, ह्यात शुभाना खरा रस आहे. जातीवंत लेखकाच हेच काम असतं.शून्यातून निघालेला माणूस, त्याच्या आशा आकांक्षा, त्याची खटाटोप, त्यांची मूल्यभावना आणि सरतेशेवटी त्या विराट नि निराकार नियतीचा त्याला लाभलेला किंवा न लाभलेला अनुग्रह, ह्या सर्वांचा खेळ लालित्याच्या अंगाने रंगवायचा, हे लेखकाचं काम असतं. सौ शुभा त्या प्रवासाला आस्थेच पाथेय घेऊन निघाली आहे. प्रवासात तिने जे वेचलं ते चित्ताकर्षक आहे. रटाळपणा नि गहिवर टाळून सौ शुभा चिटणीस ह्यांनी हे जिद्द बाळगणाऱ्या आणि कर्तव्यपूर्तीसाठी खर्ची पडणाऱ्या लोकोत्तर मंडळीचं जग, रंजक लेखणीने वाचकांना दाखवलं म्हणून त्यांचं अभिनंदन!
please login to review product
no review added