अदृश्य तरी क्षुद्र नाही असे शुक्ष्मजीव पृथ्वीवरील सजीवांपैकी सर्वात प्राचीन आणि साधे सजीव. पृथ्वीवर प्राथमिक पर्यावरण घडवण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका. आजही महत्वाच्या नैसर्गिक साखळ्यावर त्यांचीच हुकुमत. गणनाच करायची झाली तर शुक्ष्मजीव प्रमुख औद्योगिक कर्मचारी आहेत. ब्रेड, बियर, वीज, वाईन औषध आणि कीडनाशकं बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये त्यांचा उपयोग होतो. जैविक उपचार पद्धतीमध्ये, कचऱ्याच्या पुनरुपयोगासाठी प्रक्रिया करताना आणि हलक्या प्रतीच्या खनिजखडकापासून मुलद्रव्य मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. कधी तरी त्यांच्या मुळे रोगांच्या साथी पसरतात, परंतु ते सुद्धा मानवाच्या कृतीमुळे साथींच्या प्रसाराला उपकारक परिस्थिती निर्माण होते तेव्हाच. आपल्याभोवती व आपल्यामध्ये अदृश्य अवस्थेत विपुल प्रमाणात असलेल्या या शुक्ष्मजीवांकडे जवळून बघा. चांगल्या जगाच्या निर्मितीच्या किल्ल्या त्यांच्याजवळच आहेत. शुक्ष्मजीवांच्या या विश्वामध्ये तुमचे स्वागत असो!
please login to review product
no review added