अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य महराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी रुजविले. याबाबत कायदा होण्यासाठी त्यांनी सर्व पातळीवर प्रयत्न केले. अखेर त्यांच्या हत्येनंतर कायदा अस्तित्वात येत आहे पण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हा कायदा पुरेसा पडणार आहे का? अंधश्रद्धा, कर्मकांड, जादूटोणा, मंत्रजागर यांना धार्मिक आधार दिला जातो. यासाठी आधी धार्मिक विचारांमध्ये परिवर्तन होऊन धर्मश्रद्धा बाजूला ठेवणे आवश्यक आहे. धर्मश्रद्धा दूर झाल्यावरच अंधश्रद्धेला मुठमाती मिळेल, हा दृष्टिकोन संदीप जावळे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मुलन प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ मध्ये मांडला आहे. धर्म, राजकारण, धर्मनिरपेक्षतेमधील दांभिकपणा, संविधानाची मर्यादा यावर सडेतोड, निर्भीडपणे लिहिले आहे.
please login to review product
no review added