वेगवेगळ्या कोकणभूमीतली प्रादेशिकता ही मराठी साहित्याला लाभलेली एक सुभग देणगी आहे. ही भूमी मुलत: च निसर्ग परिप्लुत. साऱ्या सुंदर सृष्टीचा विधाताकृत सन्मान म्हणजे कोकण. रश्मी कशेळकर जन्मताच कोकणच्या. त्यांची सारी आयुर्धारणाच कोकणाची. त्यामुळे ललित लेखनासाठी लागणारी सामग्री आणि उर्जा त्यांना आपातत:च लाभलेली. त्यांच्या लेखनाची सर्जनशीलता कोकणच्या भूमिशी, भाषेशी आणि माणसांशी विलक्षण तादात्म्य पावते. जीवनातल्या घटना - प्रसंगांना ती उत्कटपने पण सहजविष्काराने जिवंत करते. सर्वसामान्याच्या सुखदु:खाशी समरस होणे हा या लेखणीचा धर्म आहे. निसर्गाइतकाच रश्मी कशेळकराना माणसांचा लोभ आहे. विविध प्रकृतीच्या माणसाना त्यांनी आपल्या संवेदनशील लेखणीत यथार्थतेने सामावून घेतले आहे असे झाले की, साहित्यातील रंगाला स्वर लाभतो; स्वराला गंध येतो आणि ग्रंथाला रूप चढते. काशेळकरांच्या लेखनात चेतनधर्मारोपाची कितीतरी स्थाने आढळतात. डोळस आणि सजग लेखकाच्या जीवनात अनेक स्फटिकवेष्टित पोकळ्या निर्माण झालेल्या असतात.त्यातील अदृश्य तत्वे संशोधून साकार करणे हे फार कौशल्याचे काम. या तत्वांना द्योतन देण्याची रश्मी केल्कारांचा प्रयत्न त्यांच्या चमकदार भावी आलेखनाची साक्ष देतो. - आनंद अंतरकर
please login to review product
no review added